VroyCLe™ Featured Post

संभाजी - विश्वास पाटील | प्रकरण-१ बिलामत | पान क्रमांक ३ |

संभाजी - विश्वास पाटील | प्रकरण-१ बिलामत | पान क्रमांक ३ |


बिलामत । १

१.

आभाळातला सूर्य, चर आणि शिवाजीराजा हा तिन्ही गोष्टी तिला प्राणापलीकडे प्रिय होत्या. काही वर्षामागे ती बिरवाडीला आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेली होती. एकदा सायंकाळी पाहुण्यांच्या अंगणात शिळोप्याच्या गप्पा चालल्या होत्या. तेव्हा अचानक एक भयंकर खबर येऊन पोचली होती. पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला सर करता करता सरदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पतन पावले होते. शिवरायांनी गा कमावला होता, पण सिंह गमावला होता या भयंकर बातमीने सर्वांच्या काळजाचा टवकाच उडवला होता। जसे ते वृत्त आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांमध्ये पसरले, तसा सर्व हलकल्लोळ माजला. परकरपोलक्यातील गोदू आपले इवलेसे कान देऊन ऐकत होती, "तानाजी बहादराचा मुडदा पालखीत घातलाय, पालखी इकडंच उंबरठला यायला निघालीय. पालखीला स्वतः शिवाजीराजांनी खांदा दिलाय." चर्चा चालू असतानाच काही उत्साही पोरे उठली. त्यांनी पालखीला सामोरे आयचा निर्णय घेतला, तसा पोरांचा तो जथा वानरांसारखा उड्या मारत दरीखोरी ओलोडत मधल्या वाटेनेच जंगलातून कोंहाण्याकडे धावू लागला. जंगलराने तुडवणाऱ्या पोरांना तासाभराने लक्षात आले, त्यांच्यामागे जाळ्या खसखसत होत्या. कोणीतरी हरणीच्या चालीने त्यांच्या पाठोपाठ धावत येत होते. मुले थांबली. पाठीमागे वळून पाहू लागली आठ वर्षांची इवलीशी गोदू त्यांच्या मागोमाग पळत येत होती. ती अविस्मरणीय मिरवणूक गोदू कधीही विसरणार नव्हती. एखाद्या बळकट किल्ल्याचा बेलाग बुरूज वासळून पडावा, तसा तानाजी नाचाचा शिवरायांचा हातच निखळून पडला होता. शिवरायांच्या तेज:पुंज चणेवरची सुतकी कळा पाहवत नव्हती. वाटेतल्या गावातून लोक झुंडीने गोळा व्हायचे. पालखी थांबवली जायची. तानाजीच्या मुखावरचा शेला बाजूला केला की, त्याची फुलासारखी कोमेजून, गेलेली चर्या दिसायची, अन् शिवाजीराजांसारखा धैर्यवान महापुरुषही हेलावून जायचा. पालखीसोबत निघालेला दोनतीन हजार लोकांचा नदीच्या पाण्यासारखा घोगावत जाणारा तो लोंदा, ते अतीव दुःख, बलिदानाच्या भावनेने फुरफुरलेले ते बाहू, गोदूचे ठेचकाळलेले पाय - त्या उणकत्या वेदना गोटू च्या मनः पटलावरून आजपानेस्तोवर नाहीशा झाल्या नव्हत्या. अर्थी रात्र सरूनही नवरा बिछान्याकडे माधारी वळला नव्हता. शंकाकुशंकांच्या साल मुंग्या तिचा मेंदू बधिर करू लागल्या. असली कसली म्हणायची ही खलबतं? गोदू पुन्हा उठली आणि दाराच्या तोंडाशी येऊन उभी राहिली मघाची ती बैठक सरली नव्हतीच,

संभाजी । ३
||| ==>> पुढील पान : |  प्रकरण-१ बिलामत ||| संभाजी-विश्वास पाटील |||

Comments