- Get link
- X
- Other Apps
VroyCLe™ Featured Post
Posted by
VroyCLe Vision
- Get link
- X
- Other Apps
प्रत्येक जण आयुष्यातील हे धोके टाळतो?
एकदा एका माणसाने एका शेतकऱ्याला विचारलं, "चालू हंगामात गहू पेरलाय का?" शेतकऱ्याने उत्तर दिलं, "नाही. कारण यंदा पावसाची काही खात्री नाही." त्या माणसाने विचारलं, ' मग तू मका पेरलास का?" तो शेतकरी म्हणाला, "नाही मक्याच्या पिकावर कीड पडेल अशी मला भीती वाटली." त्या माणसाने विचारलं, "मग तू काय पेरलंस?" शेतकरी म्हणाला, "काही नाही. मी म्हटलं की कुठलाही धोका पत्करायला नको. "
धोके
रडण्यामध्ये हळवं ठरण्याचा धोका असतो.
भेटण्यामध्ये एकमेकात गुंतण्याचा धोका असतो. भावना व्यक्त करण्यात स्वत:चं खरं रूप प्रकट होण्याचा धोका असतो. लोकांसमोर तुमचे विचार, तुमची स्वप्न जाहीर करण्यात ते गमावण्याचा धोका असतो.
प्रेम करण्यात प्रतिसाद न मिळण्याचा धोका असतो. जगण्यात मरणाचा धोका असतो. आशेत निराशेचा धोका असतो.
प्रयत्न करण्यात अपयशाचा धोका असतो. जो माणूस कोणताही धोका पत्करत नाही, काहीही कृती करत नाही, त्याच्याजवळ काहीही नसतं आणि त्याच्या अस्तित्वाला काहीही अर्थ नसतो. किंवा आयुष्य जगायला शिकणार नाहीत.
पण धोके हे पत्करलेच पाहिजेत, कारण कुठलाही धोका न पत्करण हेव आयुष्यात सर्वात धोकादायक असतं.
ते यातना आणि दुःख टाळू शकतील, पण ते इतरांच्या भावना जाणून घ्यायला, बदलायला, मोठं व्हायला, प्रेम करायला आपल्याच मनोवृत्तीच्या शृंखलांनी जखडलेले ते गुलाम असतात, त्यांनी आपलं स्वातंत्र्य गमावलेलं असतं. धोके स्वीकारणारा माणूसच खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो.
Comments
Post a Comment
Thanks for message to VroyCLe™.