VroyCLe™ Featured Post

संभाजी - विश्वास पाटील | प्रकरण-१ बिलामत | पान क्रमांक ६ |

संभाजी - विश्वास पाटील | प्रकरण-१ बिलामत | पान क्रमांक ६ |

बिलामत । १




१.

त्याचवेळी हातातल्या भाल्याच्या काठीचा आधार उठली. तिने डोंबाऱ्याच्या पोरासारखी काठी धरून पुढच्या बाजूला उडी ठोकली. एक क्षणही न दवडता बाणासारखी दरवाजाकडे धावली. दारावर जोरजोरात धक्के देत ती आरोळ्या देऊ लागली, "अरे, घात झाला घात! दार उघडा दार!" तिचा चिरका आवाज अंधाराचं काळीज कापीत गेला. पहारेकरी कमानीच्या टोकावर आले. दिवट्यांच्या लाल प्रकाशात उभ्या असलेल्या गोदूकडे रोखून पाहिले. तिच्या झिपऱ्या वाऱ्याला लागल्या होत्या. विस्कटलेले ध्यान कोणाशी तरी हातघाई करून आल्यासारखे दिसत होते. घाणेरीच्या झुडपाने चेहरा ओरखडलेला. अंगावरचे लुगडेही फाटलेले. ती बेंबीच्या देठापासून ओरडत, कळवळून बोलली, "पहारेकरी दादा, दरवाजा उघडा हो दरवाजा. मला राजांना तातडीनं अगदी आत्ताच्या आता!" "कोण, कुठली गं तू? तुला शिवाजीराजांचा कायदा माहीत नाही "पण दादा --?" "किल्लेदार सकाळी सातप्रहरालाच किल्ल्यांचा जुडगा घेऊन इथं येतील.तेव्हाच दरवाजा उघडेल. तोवर नाही," वरून पहारेकऱ्याचा राकट आवाज आला. "पण तोवर घात होईल हो घात. राजांच्या जिवाला धोका आहे. दया मला आत सोडा हो!" पहारेकरी हसले. रात्रीबेरात्री असे अनेक वेडेखुळे जीव आणि भुतंखेतं दरवाजाच्या आजूबाजूला फिरत असतात म्हणे! गोदू मात्र वेडीपिशी झाली होती. काहीही करून ही भयंकर बातमी तिला तात्काळ गडावर पोचवायची होती. तिने खूप आर्जवे केली. ती ओरडली. किंचाळली.विनवण्या करून कंटाळली. आता इथे थांबून वेळ गमावण्यात हशील नव्हते.    ती तेथून हळूच बाजूला झाली. करवंदीच्या जाळ्यांतून चितदरवाजाच्या पश्चिमेला ती भूतासारखी पुढे सरकू लागली. आईच्या मांडीवर असल्यापासून ती बहादूर हिरकणी गवळणीची गोष्ट ऐकत आली होती. एकदा सायंकाळच्या तोफेबरोबर गडाचे दरवाजे बंद त्यामुळे वर दूधाचा विक्रा करायला आलेली हिरकणी गवळण अडकून पडली. किल्ल्याच्या तळाशीच तिची वाडी होती. तिचे दूधपिते लेकरू घरात एकटे होते. आपल्या लेकराला स्तनपान करण्यासाठी एका आईचा जीव आसुसला होता. त्याच बेहोषीत रात्रीच्या अंधारात ती किल्ल्याचा कातीव उतरून धाडसानं खाली गेली होती. लेकराच्या भुकेसाठी एका आईने आपला जीव धोक्यात घातला होता. आता इथे एका पराक्रमी जीव धोक्यात होता. ज्याच्या अस्तित्वाने दगडाधोंड्यांच्या या माळरानाला स्वराज्याचा शेंदूर फासला गेला होता. गावागावातले आणि रानातलेही लांडगे हटले होते.

६ | संभाजी 
||| ==>> पुढील पान : |प्रकरण-१ बिलामत ||| संभाजी-विश्वास पाटील |||

Comments