- Get link
- X
- Other Apps
VroyCLe™ Featured Post
Posted by
Vaibhav Ghadge
- Get link
- X
- Other Apps
बिलामत । १
१.
गोरगरिबांच्या लेकीबाळीची अब्रू वाचली होती. ज्याच्यामुळे देवळांत देव राहिले होते आणि डोईवरच्या शेंडया वाचल्या होत्या. त्याच त्या मराठ्यांच्या पंचप्राणाचा - शिवाजीराजांचा जीव धोक्यात होता. त्यासाठी नक्कीच काही तरी करायला हवं होतं. कोंढाणा सर करणाच्या तानाजीच्या यशवंती घोरपडीसारखा गोदूचा जीव तळमळू लागला. ती जाळ्या, झाडेझुडपे पालथी घालत होती आणि वर चढ़न जाण्यासाठी एखादी वाट, चोरवाट आहे का त्याचा शोध घेत होती. पण तिला तसा जास्त वेळ दवडावा लागला नाही. पावसाळ्यात किल्ल्यावरून धो धो वाहणारे पाणी बाहेर काढण्यासाठी पुसाटीच्या एका बुरुजाला एक दोनतीन मनगटाएवढे भोक रिकामे सोडण्यात आले होते. मागचा पुढचा विचार न करता गोदूने आपली मुंडी त्या भोकामध्ये घातली. अन उभ्या कातळांना कोपराच्या ढुसण्या देत ती वर सरकू लागली. त्या धडपडीत तिचे अंग अनेक ठिकाणी सोलपटून गेले. अंगावरचे लुगडे जागोजाग फाटले. जीव कोंदटला. श्वास गुदमरला. परंतु शिवरायांचे आणि आईभवानीचे नाव घेत एकदाची ती वर चढून गेली.रायगडावरचा अंधार नाहीसा होऊ लागला. पहाटेपासूनच रंगपंचमीची तयारी सुरू होती. किल्ल्यावरचे राजरस्ते फुलमाळांनी, झिरमुळ्या-तोरणांनी सजविले गेले होते. शिवाजीराजांच्या प्रासादापुढे सनईचौधडा वाजत होता. झुली आणि पाखरा चढवून हत्ती सजवले जात होते. फकीर, गोसावी, लहान मुलेबाळे सारेच नवे, रंगीबेरंगी कपडे घालून इकडे तिकडे हुंदडू लागले होते. कमरेला तलवार खोचलेले आणि हातामध्ये भाले-बरच्या घेतलेले पहारेकरी महाराजांच्या दरवाजावर खडा पहारा देत होते. तितक्यात बेभान झालेली गोदू तिथे धावत आली. पहारेकऱ्यांच्या हातापाया पडत त्यांना विनवू लागली, "मला महाराजांना भेटू द्या हो.... महाराजांना भेटू द्या." गोदू पुन:पुन्हा विनवू लागली. अनेकवेळा सांगूनही ती मागे हटेना. तेव्हा पहारेकरी तिच्यावर कडाडले, "कशासाठी, कशासाठी भेटायचंय तुला महाराजांना?" इतक्यात पलीकडून घोड्यांच्या टापांचे जोरदार आवाज आले. सर्जा नावाच्या उंच पाठीच्या आणि आभाळी रंगाच्या घोड्यावर एक अत्यंत देखणा राजकुमार बसला होता. त्याच्या जिरेटोपावर पाचूंच्या माळा रूळत होत्या. त्याचा रंग फिकट तांबूस, रुंद कपाळ, गरुडाच्या नाकासारखी नाकसरी, गडद काळे डोळे- एकूणच त्याचे व्यक्तिमत्त्व कोणाच्याही डोळ्यांत सहज भरणारे होते. रेशमी केसांची त्याची कोवळी कातीव दाढी, पल्लेदार मिशा आणि खांद्यावर रुळणारे मुलायम केस त्याच्या उपजत सौंदर्यात भर घालत होते. तो उमदा वीर घोडा उडवत तेथे येऊन पोचला. त्या बरोबर, "शंभूराजे ऽऽ संभाजीराजे" अशी कुजबुज वाढली. शंभूराजांच्या पाठोपाठ घोळदार जामानिम्यातले
संभाजी । ७
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
Thanks for message to VroyCLe™.