- Get link
- X
- Other Apps
VroyCLe™ Featured Post
Posted by
VroyCLe Vision
- Get link
- X
- Other Apps
बिलामत । १
१.
हवं तर त्यांच्या गावावर माणसे पाठवा. पण आजन त्यांना जेरबंद करा! "जशी आज्ञा, राजन-" असे म्हणत आपली पाठ न दाखवता, मुजरा करत युवराजांचे सर्व सहकारी लागलीच कामगिरीयर बाहेर पडले. अतिशय घाबरून गेलेल्या, थरथरत उभ्या असलेल्या गोदूकडे युवराजांनी एक नजर टाकली. त्यांनी येसूबाईना सांगितले, "हिला ल्यायला चांगली वसं द्या. आम्हाला वाटतं रायगडावर येणारी मोठी बिलामत हिच्यामुळे टळली. तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. ह्या गोदूला आपण संरक्षण द्या." युवराज तातडीने स्नानगृहाकडे वळले. पूजाअर्चा आटोपून त्यांना त्वरेने बाहेर पडायचे होते. आता रायगडावर लख्ख उजाडले होते. जागोजाग लेझिमवाली पोरे आणि दांडपट्टा खेळणारे खेळगडी घोळक्याने गोळा होऊ लागले होते. सनईचौघडा, फुलांची आरास, रांगोळ्या, इकडेतिकडे उधळणारे तरुण अशी शिवरायांच्या राजप्रासादासमोर उत्सवाला बहार आली होती. तितक्यात अतिशय घाबरून गेलेले यंबकराव आणि निवासराव तेथे येऊन पोचले.आपल्याआधी जर गोदु महाराजांना जाऊन भिडली आणि आपले बिंग फुटले तर आपणाला कडेलोटाशिवाय अन्य शिक्षा मिळणार नाही, याची बापलेकांना पुरती कल्पना होती. त्र्यंबकराव एका पहारेकऱ्याला दबक्या आवाजात विचारू लागला, "नारिंगी लुगड्यातली, खडीची चोळी घातलेली एक तरणीताठी बाई इकडं आलेली बघितलीत?" "व्हय व्हय, मघाशी एक बया इथं आली होती. पण मघाशीच तिला घेऊन शंभूराजे गेले आपल्या वाड्याकडं." ती गोष्ट ऐकून वाडकर पितापुत्र काहीसे बावरले. पण लगेच सावरलेसुद्धा. गोदूने आपल्या विरुद्ध कांगावा करण्याआधी तिलाच बदनाम करायची, ही नामी संधी चालून आली होती! आपल्या गळ्यामध्ये पडणारी पेटत्या फटाक्यांची माळ काढून ती बेसावध युवराजांच्या गळ्यामध्ये घालायची. बायाबापड्यांच्या नावे शंभूराजांना बदनाम करायची कारस्थाने आधी चालूच होती. त्यात गोदूचेही प्रकरण खपवू. अंगावर आलेले भयंकर संकट कसे का होईना, टळले म्हणजे चांगले! ते दोघेही पितापुत्र शंभूराजांच्या वाड्याकडे धावले. मात्र प्रत्यक्ष तिथे पोचल्यावर भितीने त्यांचे पाय लटपटू लागले. दोघांनी एकमेकांना चेतवायचा प्रयत्न केला. पण सिंहाच्या गुहेत शिरून त्याला ललकारण्याची हिंमत त्या दोघांमध्येही नव्हती. घाबरलेल्या बापलेकांनी घोडी तशीच पुन्हा महाराजांच्या राजप्रासादाकडे वळवली. आज पंचमीच्या मिरवणुकीत सामील होण्यासाठी राजांच्या वाड्यापुढे तोबा गर्दी गोळा झाली होती. पंचक्रोशीतले सारे हौसे, गौसे आणि नवसे तिथे जमले
संभाजी । ९
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
Thanks for message to VroyCLe™.