- Get link
- X
- Other Apps
VroyCLe™ Featured Post
Posted by
VroyCLe Vision
- Get link
- X
- Other Apps
बिलामत । १
१.
मध्यरात्रीचा झोंबरा, थंडगार वारा वाहत होता. आज काही केल्या गोदूच्या डोळ्यास डोळा लागत नव्हता. वाडयाशेजारच्या जुनाट पिंपळावरच्या डहाळ्यांतून आणि बाजूच्या बांबूच्या बनात वाऱ्याची भिरभिर सुरू होती. पिंपरणीची इवलीशी फळे आड्यावरच्या हातकौलांवर टप टप आवाज करीत पडू लागली. गोदूने या कुशीवरून त्या कुशीवर मान वळवली. तिच्या मनगटातला हिरवा चुडा अजून उतरला नव्हता. उणापुरा एक महिनाच झाला असेल तिच्या लग्नाला तिन्हीसांजेची झाकढाळ एकदा उरकली आणि देवघरापुढे सासूबाईंचे अंथरुण टाकले, की गोटू आपल्या खोलीत यायची. ती पलंगावर पाठ टेकते न टेकते तोवर तिच्या खोलीबाहेर नवऱ्याची दबकती पावले वाजायची. आजची रात्र मात्र गोदूला काहीशी विचित्र वाटत होती.देवघरातल्या समया केव्हाच विझल्या होत्या. पलीकडच्या खोलीतून सासूबाईच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत होता. रात्र बरीच झाली होती. मात्र खोलीबाहेर तिच्या नवऱ्याचा, निवासरावचा पत्ता नव्हता. गोठ्यातली जनावरे आणि खुराड्यातली कोंबडीही अजून जागीच होती. आजची उभी रात्रच गोदूला उगाचच विचित्र, तितकीच विषण्ण भासत होती. ती मध्येच अंथरुणावरून उठली. एक सोपा ओलांडून तिने हळूच अंगणाकडे नजर टाकली. दिंडी दरवाजाच्या आतल्या बाजूला पडवीवर एक तांबूसलाल मशाल ढणढण जळत असलेली तिने पाहिली. तिथेच खाली पडवीवर कसलीशी एक तातडीची गुप्त मसलत चाललेली दिसत होती. गोदूचे सासरे त्र्यंबकराव चिंताग्रस्त मनाने चवड्यावर बसले होते. त्यांच्या पुढ्यातच निवासराव काहीसा बावरा होऊन बापाकडे टकामका पाहत होता. त्या मसलतीत आणखी तीन अनोळखी, भेसूर चेहन्यांची माणसे हजर होती. त्र्यंबकरावकडे बारा गावचे देशपांडेपण. त्यामुळे आला असेल एखादा वाद, असा विचार करीत गोदूने तिकडे कानाडोळा केला. वाढत्या रात्रीबरोबर वारा वेळूच्या बनात धिंगाणा घालू लागला. कौलांवर पिंपरणीच्या फळांचा नुसता सडा पडत होता. भीतीने गोदूचे काळीज कालवले जात होते. असली कसली म्हणायची ही राजकारणं! तसे गोदूचे माहेर म्हणजे महाडजवळचे एक आडवळणी खेडे, परंतु गोदूचे व्यवहारज्ञान उत्तम होते. तिचे काका छत्रपती शिवाजीराजांच्या अष्टप्रधानातले सुरनवीस अण्णाजी दत्तो प्रभुणीकर त्यामुळेच काका-मावशीकडे गोदू अनेकदा रायगडला आणि पाचाडला जात असे. शिवशाहीत नेमके काय चालले आहे, कोणत्या नव्या मोहिमा आखल्या जात आहेत, ह्या साऱ्या गोष्टी तिच्या कानावर यायच्या. छत्रपती शिवरायांवर गोदूची जिवापाड भक्ती होती.
२। संभाजी
- Get link
- X
- Other Apps
Comments
Very Nice ....Every one should read
ReplyDeleteThanks Dear Ishwari For Your Comment , If you like it then share it to all your friends.
Delete