- Get link
- X
- Other Apps
VroyCLe™ Featured Post
Posted by
VroyCLe Vision
- Get link
- X
- Other Apps
बिलामत । १
१.
"चल, पळ मर्दा! घे बिगी बिगी धाव," असे ओरडत होती. घोड्याच्या तोंडाला फेस येत होता. त्याचे तुषार तिच्या मुखावर उमटत होते.बघता बघता गोदू पाचाडच्या वेशीपाशी जाऊन पोहोचली. आता पहाट सरत होती.डोंगरकडे,सुळके,गडावरच्या माच्या,हिरकणीचा बुरूज अन पल्याडचा कोकण दिव्याचा उंच कडा-साऱ्या डोंगररांगा आणि कातीव कडे अंधारातून डोकं बाहेर काढू लागले होते. पाचाड पाठीमागं पडलं. घोडा समोरची तिरपी चढण वेगाने चढू लागला.अन् उजाडता उजाडता गोदूच्या डोळ्यांपुढे चितदरवाजाची कमान उभी राहिली. "बापू, मघाशी आपल्या वाड्यामागं कुणाच्या तरी जनावराची पावलं वाजल्यासारखा आवाज आला होता बघा,"निवासरावने आंदेशा बोलून दाखवली.तिघेही गांगरले.शंकेची इंगळी काळजाला डसली. वाडकरांच्या वाड्यामध्ये गडबड उडाली. बैठकीतून सर्वजण पटापट उठले. वाड्याच्या पाठीमागं धावले. तर पाठचा दरवाजा उघडा होता. पागेचेही दार सताड मोकळे अन् आश्चर्य म्हणजे पाखऱ्या नावाचा सर्वात चपळ आणि तगडा घोडाच जागेवर नव्हता. सळसळत्या पिंपळाच्या बुडाखाली सर्वजण घाबरून उभे होते.इतक्यात निवासरावची म्हातारी आई तिथे पोचली. घरातून आपली सूनबाई कुठे गडप झाली आहे असं विचारू लागली.आता मात्र त्र्यंबकराव वैतागून मनगट चावू लागला. कसली म्हणायची ही भानामती? पागेत घोडा नाही. घरात सून नाही. तितक्यात मोठ्याने भोकाड पसरत निवासराव आतून बाहेर आला, "बापू, घात झाला घात. पळाली. तुमची सून पळाली." "म्हणजे रे?" "मी शपथ घेऊन सांगतो ती छिनाल रंडीच शिवाजीची भगत आहे. ती घोडा घेऊन रायगडाकडे धावली असणार आपलं बिंग फोडायला!" बापलेकांचे चेहरे खर्रकन् उतरले होते.आखूड दाढीची आणि भेसूर तोंडाची ती पाहुणेमंडळीही घाबरून गेली होती.एका पाठोपाठ एक अशी पाचसहा घोडी पागेतून बाहेर पडली. सारेजण वाऱ्याच्या वेगाने रायगडाकडे धाव घेत होते. काय वाटेल ते करून गोदूला वाटेतच रोखायचे होते. तरच पुढची बला टळणार होती.सारेजण रायगडाच्या दिशेने त्वेषाने घोडी दामटीत होते. एकदाची चितदरवाजाची पाषाणी कमान दिसली आणि धाप लागलेल्या गोदूने जागीच घोडा रोखला.ती स्वतः घामाने डबडबून गेली होतीच.पण तिच्या मांडीखालचा घोडाही दमून गेला होता. त्याच्या तोंडातून लाळेचा लोळ वाहत होता.
संभाजी । ५
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
Thanks for message to VroyCLe™.