VroyCLe™ Featured Post

|छत्रपतींची सत्ता पेशव्यांकडे कशी गेली|

|छत्रपतींची सत्ता पेशव्यांकडे कशी गेली?|


| छत्रपतींची सत्ता पेशव्यांकडे कशी गेली ? |

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, त्याचा मुलगा शहा आलम हा गादीवर बसला. मुघलांच्या कैदेत असलेली शाहू महाराज आणि त्यांच्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब. त्यामुळे महाराणी ताराबाई चा मुलगा शिवाजी द्वितीय याला छत्रपती गादीवर बसून , तो अल्पवयीन असल्यामुळे मराठा राज्याचा कारभार स्वतः महाराणी ताराबाई स्वतः करत होत्या. मुगल बादशहा शहा आलम याच्या डोक्यात एक विचार आला, जर आपण शाहू महाराजांची सुटका केली तर ताराबाई आणि शाहू यांच्यामध्ये तेढ निर्माण होईल. शाहू ,छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र असल्यामुळे मराठा तक्ता वर मूळ अधिकार त्याचाच. अशी विचारधारणा शहा आलम ची होती. यामुळे त्याने शाहूंची सुटका केली आणि मराठा राज्याचा राजा म्हणून त्याची घोषणा केली. शाहू महाराज (थोरले )यांनी औरंगजेबाच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर महाराष्ट्र मध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत झाले. आता ताराबाईला चिंता वाटू आपला मुलगा शिवाजी दुसरा गादीवर असताना, शाहू महाराज आपला अधिकार सांगणार आणि छत्रपती गादी चा मूळ वारस मीच. त्यामुळे महाराणी ताराबाई ने एक युक्ती लढवली. तिने सर्वत्र घोषणा केली छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी आणि त्यांचा मुलगा 28 वर्ष मुघलांच्या कैदेत आहेत परंतु कशावरून हा शाहू छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र असेल.तो तोतया ही असू शकतो आणि अजून पर्यंत ते दोघे ‌ शाहू आणि महाराणी येसूबाई जिवंत आहेत की नाहीत हेही आपल्याला माहीत नाही याची पूर्णतः खबर नाही. असं सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि सरदार आणि मंत्र्यांना समजावत त्यांनी हे पाऊल उचललेे. -------------------------------------------------

||| ==>> पुढील पोस्ट : संभाजी - विश्वास पाटील. संपूर्ण कादंबरीप्रकरण-१ बिलामत ||| संभाजी-विश्वास पाटील |||

Comments